Mira Road Crime News : गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा यांना यश ; 34 वर्षापासुन खुनाच्या गुन्हयांत फरारी असलेल्या आरोपीस अटक
![भिवंडी गुन्हे शाखा कक्ष-2](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/04/Mira-Raod-Crime-News.jpeg)
•34 वर्षापासून खून करून फरार असलेला आरोपी पोलिसांनी केले अटक, एकूण पाच आरोपींना पोलिसांनी केले अटक,1990 मध्ये केला होता खुन
मिरा रोड :- 34 वर्षापासून खून करून फरार असलेला आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. काश्मीरा पोलिसांनी यशस्वी कामगिरी केली आहे. फिर्यादी नावे रॉयल ऊर्फ रेनॉल्ड क्रिस्टन अमन्ना, मरोळ, मिल्ट्री रोड, अंधेरी पूर्व यांनी फिर्याद दिली कि, 02 डिसेंबर 1990 रोजी 10 वाजता. मीजे मिरा येथील मिरा अपार्टमेंट, येथे पार्टी चालू असतांना यांतील आरोपी नामे स्टिव्ह मारवीन नाझरेस डेव्हिड यांने मागील भांडणाचा राग मनात धरुन, गैर कायदयाची मंडळी जमवून, गर्दी करून यातील मयत सेंद्रीयल ऊर्फ सुधाकर क्रिस्टल अमन्ना (22 वर्षे), ब्लॉसम सोसायटी, मरोळ, मिल्ट्री रोड, अंधेरी पूर्व यास यातील आरोपी यांनी त्याचेवर चाकुने वार करुन त्यास जिवे ठार मारुन खुन केला होता. फिर्यादी वरुन काशिमीरा पोलीस ठाणे भा.दं.वि.सं. कलम 302,147,148,149,120 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Crime News
1) संजय रा. भांडुप
2 ) जहांगीर दिनमोहमद शेख रा. चिमटपाड़ा मरोळ मुंबई,
3) संतोष,
4) पास्कोल
5) किशोर हे गुन्हयांतील पाहीजे आरोपी आहेत.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गंभीर व क्लिष्ट स्वरुपांचे खुनाच्या गुन्हयांतील पाहीजे व फरारी आरोपींचा शोध घेणे बाबत पोलीस आयुक्त यांनी आदेशीत केले होते. गुन्हे शाखा कक्ष 1, काशिमिराचे अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी यांचा शोध घेत होते. पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा यांचे बातमीदारामार्फत आरोपी नावे जहांगीर दिनमोहमद शेख यांची माहीती मिळाली होती. त्या अनुशंगाने आरोपी नावे जहांगीर दिनमोहमद शेख (61 वर्षे), (व्यवसाय-बेकार, रा. रुम नं. 08, देवकी नंदन चाल, चिमटपाडा, अधेरी कुर्लारोड, अंधेरी पूर्व, मुंबई 59) दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी 05.00 वाजता ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीतांकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपीताचा सदर गुन्हातील सहभाग निष्पन्न झालेला आहे. आरोपीतास पुढील कारवाई कामी काशिमीरा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे. Mira Road Crime News
पोलीस पथक
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सारे, गुन्हे शाखा, पांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अधिराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार संतोष लांडगे यांनी केली आहे. Mira Road Crime News