Mira Road Crime News : पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाकडे उत्तेजित द्रव्य ; पोलिसांकडून उमेदवारांवर गुन्हा दाखल
•मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरतीच्या बैठकीचाचणीत तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल, उत्तेजित द्रव्य उमेदवारांकडे आढळून आले
मिरा रोड :- पोलीस भरतीसाठी मिरा रोड येथे सुरू असलेल्या मैदानी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धावताना स्फुर्ती यावी यासाठी या उमेदवाराने उत्तेजन पदार्थाचे सेवन केले होते, ते उत्तेजक द्रव्य पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस भरती मैदानी चाचणीत महानगरपालिकेच्या बेवर्ली पार्कमध्ये आयोजित केलेल्या मैदानी चाचणीमध्ये तीन उमेदवारांकडे उत्तेजक पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम 188,511 सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रधान अधिनियमन 1940 कलम 188 (क),(1) प्रमाणे 28 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस शिपाई भरती करता आलेला एक उमेदवार याच्याकडे 30 जून 2024 रोजी उत्तेजक पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाल्याने त्याच्यावरही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम 188,511 सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रधान अधिनियमन 1940 कलम 188 (क),(1) प्रमाणे 30 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.