Uddhav Thackeray : अंबादास दानवे यांच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
•विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसाकरिता निलंबन, विरोधी पक्षाचे भूमिका मांडून देणे गरजेचे ; Uddhav Thackeray
मुंबई :- पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या दिवशी विधान परिषदेमध्ये राहुल गांधी यांच्या हिंदुत्वाच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत खडा जंगी झाली होती. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आज उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचे पाच दिवसाकरिता सभागृहातून तसे विधिमंडळातून निलंबन करण्यात आले आहे असे ठरावाला मंजुरी दिली. यावर पक्षप्रमुख यांनी समाचार घेतला आहे.
आता देशात आणि राज्यात जे काही चाललं आहे, आपल्याला माहिती आहे की विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज असते. त्यावर विरोधी पक्षाची भूमिका मांडू देणं गरजेचं असतं. त्यानंतर निर्णय देत असतात. मात्र, एकतर्फी निर्णय देणं हे लोकशाहीला घातक आहे. खरं तर अंबादास दानवे यांनाही त्यांची बाजू मांडू देण्याची आवश्यकता होती. विरोधी पक्षाकडून कोणालाही बाजू मांडू देण्यात आली नाही. जणूकाही हे सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर केला.
अंबादास दानवे यांच्या विधानाबद्दल मी पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी मागायला तयार आहे. मी माफी मागतोही. कारण आम्हाला त्यांच्याबद्दर आदर आहे. मात्र, लोकसभा प्रचाराच्यादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण-भावांच्या नात्याबद्दल जे विधान केलं होतं. त्याबद्दल कोण माफी मागणार आहे? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत विधान केलं होतं. मग हा माता भगिनींचा अपमान नाही का? मग मी जर यावर माफी मागतो आहे. मग सभागृहात बोललं तर अपमान आणि जाहीरपणे बोललं तर अपमान नाही का? हे कुठलं गणित? सुधीर मुनगंटीवार यांना तर जनतेनं निलंबित केलं आहे, आता विधानसभेलाही निलंबित करतील”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे निलंबित केलं गेलं असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमचा जो काही विजय झालेला, तो विजय झाकून टाकण्यासाठी, त्याच्या बातम्या मागे पडण्यासाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असावी”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.