Mira Road Crime News : तुळींज पोलीसांची मोठी कारवाई ; बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घर भाडयाने देणाऱ्या मालकांवर कारवाई
परदेशी नागरीकांना रुम भाडयाने दिल्याची माहिती पोलीस ठाण्यास न दिल्याने 11 घर मालकांवरती तुळींज पोलीस ठाणेची कारवाई
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात, तुळींज पोलीस ठाणेच्या हद्दीत प्रगतीनगर व गोरेगांव भागात मोठ्या प्रमाणात परदेशी नायजेरीयन व इतर आफ्रिकन देशातील नागरिक घरे भाडे तत्वांवर घेवुन राहवयास आहेत. विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 7 अन्वये कोणत्याही परदेशी नागरीकांना व्यवसायीक तत्त्वावर राहण्यास देणे, या बाबतची माहिती संबंधितांनी 24 तासाच्या आत स्थानिक पोलीसांना परकीय नागरीक त्यांच्याकडे राहण्याकरीता आल्याची सुचना देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्याची तरतुद आहे.त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांनी मनाई आदेश सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये आदेश पारीत केले होते. सदर मनाई आदेशान्वये घरात भाडे तत्वावर हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस, क्लब इत्यादी ठिकाणी परदेशी नागरीक आल्यास त्यांची माहिती विहीत प्रपत्रामध्ये 24 तासाचे आत पोलीसांना देणे बंधनकारक आहे. मनाई आदेश पारीत केल्यानंतर त्याबाबत पोलीसांनी वर्तमानपत्रे, भित्ती पत्रके याव्दारे समाजात जागृती केली होती.
तरीही काही घरमालकांनी त्यांचेकडे नायजेरीयन व इतर आफ्रिकन देशातील नागरीक भाडेतत्वावर राहण्यास आलेबाबत त्याची माहिती पोलीस ठाणेस न दिल्याने तुळींज पोलीस ठाण्यास एकुण 11 घरमालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन घरमालकांना अटक करुन त्यांना न्यायालया समक्ष हजर केले.
त्यामुळे घर मालकांच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने सदर घर मालक आरोपी कारावसाची शिक्षा व दंडास पात्र राहणार आहेत. त्यामुळे सर्व नागरीकांनी परदेशी नागरीक भाडेकरु ठेवतांना त्यांची माहीती पोलीस ठाणेस दयावी तसे न केल्यास त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करुन न्यायालयामध्ये खटला पाठविण्यात येईल असे सर्व नागरिकांना पोलीसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
पोलीस पथक
पौर्णीमा चौगुले श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त , तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.