ऑनलाइन फसवणूक ; आर्थिक आमिषाला बळी
Mira Road Crime News Kashigaon Police Arrested Online Scammer : काशिगांव पोलीस ठाण्यास यश ; शेअर मार्केटमध्ये ऑन लाईन गुंतवणुक करण्यास सांगुन, फसवणुक केलेली संपुर्ण 4 लाख 50 हजार रुपये हि रक्कम तक्रारदार यांना परत
मिरा रोड :- आर्थिक अमिषाला बळी पडून एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक Online Scam झालेले पैसे पोलिसांनी परत मिळवून देण्यात यश आले. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा परीसरात राहणाऱ्या तहसिना अफ्रोज खान यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाली होती. फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाणे भादविस कलम 420,34 सह माहीती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Cyber Crime News
तक्रारी बाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंकखात्यात वळती झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करून संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठ पुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 4 लाख 50 हजार रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Cyber Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवलदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा, हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
- Telegram Channel, facebook, Instagram अथवा Watsapp वर जास्त परतावा देणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे.
- अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group वर ॲड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवुन फसवणुक करण्यात येते. एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रिशिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
- Share Market, Forex Trading, Crypto Investment, Mutual Funds मधील गुंतवणुक करण्याअगोदर आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करुनच गुंतवणुक करा.
•कोणतेही अनाधिकृत ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करु नये.
- ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ बैंकेला संपर्क करावा.
•सायबर फसवणुक हेल्प लाईन क्रमांक १९३० सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट www.cybercrime.gov.in.