महाराष्ट्र

उद्धव ठाकरे लवकरच जेलमध्ये…. नारायण राणे

Sanjay Raut Reply Naryan Rane : नारायण राणे यांच्या “त्या” वक्तव्यावरून संजय राऊत यांचा पलटवार

सांगली :- खासदार संजय राऊत Sanjay Raut आज सांगली दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांचे संवाद साधताना त्यांनी नारायण राणे त्यांच्या त्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या Maharashtra Lok Sabha 48 जागा लढवणार आहे महायुती म्हणून आमच्या योग्य समन्वयी आहे असे संजय राऊत म्हणाले त्यावेळेस त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांच्यावरही टीका केली आहे.

नारायण राणेंनी Narayan Rane वक्तव्य केलं आहे की उद्धव ठाकरेंना अटक होणार त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मग नारायण राणे कुठे असतील? दोन महिन्यांत सत्ता आमची येते आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते कुठे असतील तिहार जेलमध्ये.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच नवनीत राणांबाबत मी काहीही बोलणार नाही. काही लोकांविषयी मत न व्यक्त करणंच योग्य असतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0