मुंबई

Mira Road Crime News : सोशल मीडियावर ‘नफा डबल’ची जाहिरात… एका क्लिकनं अडकली लाखोंची गुंतवणूक!

•”शेअर ट्रेडिंगचं स्वप्न… आणि फसवणुकीचा सापळा!” सायबर पोलिसांनी उधळला ऑनलाइन फसवणुकीचा खेळ, 1.49 लाखांची रक्कम तात्काळ परत!

मिरा रोड | “फक्त काही दिवसांत डबल पैसे कमवा!” – अशा गोंडस वाक्यांनी सजलेली जाहिरात सोशल मीडियावर झळकली… आणि चतुर्वेदी यांच्या डोळ्यांपुढे उभं राहिलं शेअर ट्रेडिंगचं स्वप्न! मात्र या स्वप्नाची परिणती झाली एका थरारक फसवणुकीत!

Avinash-Ambure

मिरारोड परिसरात राहणारे चतुर्वेदी यांनी बनावट ऑनलाईन अ‍ॅपवर 1.49 लाखांची गुंतवणूक केली, पण जेव्हा नफ्याची रक्कम बॅंक खात्यात ट्रान्सफर करायची वेळ आली, तेव्हा अ‍ॅपने दिला धोका – कुठलाही व्यवहार होत नव्हता! यामुळे तात्काळ त्यांच्या लक्षात आलं की, आपण एका सायबर सापळ्यात अडकलोय.

सतर्कपणे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात आणि NCCRP पोर्टलवर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत संबंधित संशयित बँक खात्यातील रक्कम गोठवली. पुढे न्यायालयात अर्ज दाखल करून पोलिसांनी सविस्तर अहवाल सादर केला.

न्यायालयाने पोलिसांचा अहवाल ग्राह्य धरून रक्कम परत करण्याचे आदेश दिले. या निर्णयाची अंमलबजावणी करत सायबर पोलिसांनी बँकेसोबत समन्वय साधून अखेर संपूर्ण 1.49 लाख रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यावर परत जमा केली.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ,पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर,पोलीस अंमलदार सावन शेवाळे,पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे,महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे,पोलीस अंमलदार विलास खाटीक, सोमनाथ बोरकर सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0