मुंबईक्राईम न्यूज

Mira Road Crime News : मिरा रोड गुन्हे शाखेची कारवाई ; मोटर सायकल चोरी करणा-या सराईत आरोपी अटक

मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश,अटक करुन गुन्हयातील 2 मोटर सायकल हस्तगत करुन इतर 2गुन्हा उघड

मिरा रोड :- आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरीची घटना सातत्याने वाढत असताना पोलिसांनी कडक कारवाई म्हणून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या फिर्यादी नामे ज्योती अरविंद सिंग (42 वर्षे) मिरारोड पूर्व येथे राहणाऱ्या यांची 17 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास त्यांची भाची संगवी सिंग हिस पाळणा खेळवण्यासाठी त्याचे मोटर सायकल घेवुन शिवार गार्डन घेले व शिवार गार्डनचे बाहेरील रस्त्यावर त्यांची मोटर सायकल पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन मिरारोड पोलीस ठाणे भा.द.वि.सं. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Crime News

गुन्हयाचे घटनास्थळावरुन फिर्यादी यांचे व्यतिरिक्त आणखी एक मोटर सायकल चोरीस गेलेबाबत मिरारोड पोलीस ठाणेत तक्रार प्राप्त झाल्याने सदरबाबत मिरारोड पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 375 प्रमाणे दाखल करण्यात आला. नमुद दोन्ही गुन्हे एकाच घटनास्थळावरुन घडलेले असल्याने सदर गुन्हयाचे गांभीय लक्षात घेवुन वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता नमुद दोन्ही गुन्हे करणारा मिरारोड पोलीस ठाणेवरील चोरी व जबरी चोरी चे गुन्हे करणारा सराईत आरोपी अल्ताफ अली युनुस खान (39 वर्षे) रा.शॉप नं.१०, ऑटो हब, ओसवाल किरण चिल्डींग, ओम साई पेट्रोलपंप समोर, मिरा भाईंदर रोड, भाईंदर पूर्व ता.जि. ठाणे याने केले असल्याचे निष्पन्न झाले नमुद आरोपीत हा फिरस्ता असल्याने त्याचा गोपनिय बातमीदारामार्फत शोध घेवून त्यास अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीता मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय ठाणे यांचे कडून पोलीस कस्टडी घेवुन त्याचे कडुन तपास करुन मिरारोड पोलीस ठाणेत दाखल असलेल्या वरील नमुद दोन्ही गुन्हयातील चोरी केलेल्या मोटर सायकल हस्तगत करुन गुन्हे उघड करण्यात आले आहेत. Mira Road Crime News

अटक आरोपी अल्ताफ अली यूनुस खान हा सन 2008 पासून चोरी व जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपी असुन त्याचेवर यापूर्वी इकडील तसेच मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल आहेत. Mira Road Crime News

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01 मिरारोड पूर्व, डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर, पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, पोलीस हवालदार प्रफुल्ल महाकुलकर, बालाजी हरणे, परेश पाटील, संदीप गिरमे, पोलीस अंमलदार शंकर शेळके, अथर्व देवरे, चंद्रदीप दासरे यांनी केलेली आहे. Mira Road Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0