Mira Road Credit Card Scam : Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक
Mira Road Credit Card Scam ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 1 लाख 71 हजार 970 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
मिरा रोड :- क्रेडिट कार्ड च्या नावाने ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटना सातत्याने वाढत त्या अनुषंगाने पोलिसांकडून कठोर पावले उचलले जात आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे.ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील तक्रारदार कालसी यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक प्राप्त झाली ती लिंक ओपन करून त्यांनी त्या मोबाईल मध्ये बँकेचे नाव असलेले ॲप डाऊनलोड झाले. ॲप डाऊनलोड झाल्याबरोबरच त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून तीन लाख 25 हजार रुपये कट झाले चा मेसेज आला आहे. या फसवणुकीबाबत त्यांनी सायबर विभागाला सायबर पोलीस ठाणे 24 जुन 2024 तक्रार दाखल केली.
तक्रारदाऱ्याची निम्मी रक्कम सायबर विभागाने परत मिळवून दिली
त्यांच्या तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. फसवणूक रक्कम ऑनलाइन मर्चेंट च्या यांच्याद्वारे पुढे पाठवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाणेकडून तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली, फसवणूक रक्कमेपैकी 1 लाख 71 हजार 470 रुपये पुन्हा तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुवर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, विलास खाटीक,शुभम कांबळे, राजेश भरकडे यांनी पार पाडली आहे.