
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या नव्या दिवशी उपोषण स्थगित, मराठा समाजाला केले आवाहन
जालना :- मराठा समाजाला आरक्षण Maratha Arkshan मिळावे याकरिता जालना येथील अंतरवाली सराटीत गावात मागील नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हंबरून उपोषणाला बसले होते. सरकारने तात्काळ मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी Maratha Reservation उपोषणाचे हत्यार उपसले होते. मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. माझ्या माय माऊल्यांनी त्यासाठी मला वारंवार विनंती केली. त्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याचे मनोज जणांनी पाटील यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी – ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला, त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. Manoj Jarange Patil Latest News
मराठा नेत्यांनी एकमेकांना साथ द्या, मराठा समाजाने कोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मराठा समाजातील माता बहिणी मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी येथे येत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचे हाल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर गावाच्या देखील काही समस्या आहेत. माता भगिनींनी मला उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे, त्यांनाही इशारा देत त्यांनी सुरुवात केली आहे, त्याचा शेवट मराठाच करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. Manoj Jarange Patil Latest News