Mira Bhayandar Sex Racket News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,लॉजिंग आणि बोर्डिंग वर छापा, दोन पिढीत तरुणीची सुटका
Bhayandar Police Busted Sex Racket : भाईंदर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे धडक कारवाई ; हॉटेल मालकासह वेटरवर कारवाईचा बडगा
भाईंदर :- ईन्ना पॅलेस/ कॅपिटल लॉजिंग अँड बोर्डिंग या हॉटेलवर भाईंदर पोलिसांच्या (Bhayandar Police) अनैतिक मानवी (Sex trafficking) वाहतूक प्रतिबंधक शाखेने कारवाई करत हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला असून दोन पिढीत मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. शास्त्री इंडस्ट्रियल इस्टेट स्टेशन रोड समोर भाईंदर पूर्व येथे लॉज चालू होता. लॉजच्या मालकांने आणि लॉज चालवणाऱ्या मॅनेजर वेटर यांनी लॉज मध्ये येणाऱ्या पुरुषांना सेक्स करिता मुलींची मागणी केल्यास त्यांना मुली सह हॉटेलच्या रूमचे भाडे तीन हजार रुपये असे मिळत होते. Mira Bhayandar Crime News
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोगस गिऱ्हाईक आणि दोन पंचासह ईन्ना पॅलेस कॅपिटल लॉजिंग अँड बोर्डिंग पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजर अरुण देवाप्पा सालीयन (50 वर्ष), वेटर सुरेंद्र प्रसाद यादव (50 वर्ष), आरमा दोराई नाडार (48 वर्ष) यांना अटक केली असून पोलिसांनी आरोपी मालक आणि चालक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे यांनी दोन पिढीत मुलींना या व्यवसायातून मुक्त केले आहे. पोलिसांच्या सापळ्यात मॅनेजर अरुण सालीयन याला रोख रक्कम व इतर मध्ये मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. नवघर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 370 (3),34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mira Bhayandar Crime News
पोलीस उप आयुक्त गुन्हे अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, राजू भोईर शिवाजी पाटील नवघर पोलीस यांच्या पोलिसांनी कारवाई करत पीडित तरुणींची सुटका केली आहे. Mira Bhayandar Crime News