क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Bhayandar Illegal Liquor Supply : गुन्हे प्रकटीकरण शाखा भाईंदर पोलीस यांची कारवाई ; अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांना अटक

Mira Bhayandar Gavathi hatbhatti Raid By Police : 400 लिटर गावठीहातभट्टी दारु अवैद्यरित्या विक्री करीता वाहतुक करीत असताना 2 आरोपींवर केली कारवाई

विरार :- आगामी लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election 2024 चे अनुषंगाने मिरा-भाईन्दर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिसरात अवैद्य धंद्यांवर आळा बसणे करीता कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शनात्मक सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकास नियमित पेट्रोलिंग करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. Mira Bhayandar Illegal Liquor Supply

(18 मार्च) नाईट डयूटी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार के.पी. पवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत “एका सिल्वर रंगाच्या कार मधुन गावठी हातभटूटीची दारुची मोरवा गावचे दिशेने वाहतुक होणार आहे” अशी गोपनीय माहीती मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने रात्रोपाळीस ड्युटीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे व डीबी स्टाफ असे सुभाष मैदान चौक येथे सापळा रचुन थांबले असता 19 मार्च रोजी रात्री 12.35 वाजेच्या दरम्यान एक सिल्वर रंगाची सेवरोलेट कार संशयास्पद रित्या येताना दिसली. कार चालकास थांबण्याचा इशारा केला तेव्हा कार चालकाने त्यांची कार पोलीसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकानी सदर कारला आडवुन कार रस्त्याच्या कडेला घेण्यास सागितली तेव्हा कार चालकाने सदरची कार रस्त्याच्या कडेला थांबवली. कार चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने नाव 1) मच्छिद्र लहु मढवी, (40 वर्षे) त्याचे बाजुस बसलेले व्यक्तीचे नाव 2) सुरज सुनिल कोळी, (24 वर्षे), असे असल्याचे सागितले तेव्हा त्यास कारचे पाठीमागे डिकी मध्ये व पुढील सिटवर असणारे मालाबाबत अधिक चौकशी करता तो उडवाउडवीचे उत्तर देव लागला तेव्हा पाठीमागील डिकी उघडून पाहीली असता त्यात प्लास्टिकच्या पिशव्या मध्ये गावठी हातभट्टीची दारु भरलेली आढळून आली. सर्व गोण्या उघडुन पाहीले असता प्रत्येक गोणी मध्ये 4 प्लास्टिक पिशव्या (प्रत्येकी 10 लिटर) एका गोणीमध्ये 40 लिटर दारु अशा एकूण 10 गोण्या मिळून एकूण 400 लिटर गावठीहातभट्टी दारू व वाहनासहीत एकूण 2 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पंचनामा करून दोन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mira Bhayandar Illegal Liquor Supply

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-01, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग,सुर्यकांत नाईकवाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाईंदर पोलीस ठाणे, विवेक सोनवणे, सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक भाईंदर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार राजेश श्रीवास्तव, के. पी. पवार, के. आर. पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस अंमलदार सुशिल पवार, संजय चव्हाण यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0