मुंबई

Mira Bhayandar Crime News : मीरा-भाईंदरमध्ये 25 लाखांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

प्रतिबंधित गुटख्याचा साठा करणाऱ्या आरोपीला अटक, नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे प्रकटीकरण कक्ष -1, काशीमिरा यांनी 25 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

25 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1 यांना भाईंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट रोडवरील एका दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकानावर छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांना तब्बल 25 लाख 20 हजार 663 रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या चौकशीत हा गाळा गौरव जयंतीभाई हप्पानी याच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ आणि भारतीय न्याय संहिता, 2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवघर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. यात पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0