Mira Bhayandar Crime News : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश
नवघर पोलीस ठाणेची धडाकेबाज कामगिरी
मीरा-भाईंदर:- नवघर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. परदेशात नोकरी लावायचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश नवघर पोलीस ठाणे गुन्हा भादविस कलम 419,420,406,34 सह दि इमिग्रेशन ॲक्ट 1983 चे कलम 20,24 प्रमाणे दिनांक 27 एप्रिल रोजी गुन्हा नोंद होता. गुन्हयातील फिर्यादी पवन नसीच सिंग (38 वर्षे) जे.सी.ची ऑपरेटर. व्हिलेज गाय बनवाल, जि. पठाणकोट, सुजानपुर,यांना आरोपींना जेसल पार्क, भाईंदर पूर्व येथील कंपनीद्वारे परदेशात नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून त्यांचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवुन आरोपींकडे कोणताही नोकरी लावण्याचा परवाना नसतांना परदेशात नोकरीस पाठवतो असे सांगून फिर्यादीकडून एकुण 79 हजार इतकी रक्कम घेवून फिर्यादीची फसवणूक केली त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला, तपासादरम्यान अशाच प्रकारे एकूण 100 ते 150 तरुणांची आरोपींनी फसवणुक करुन रुपये 10 लाख 20 हजार एवढ्या रक्कमेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-01, सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुचना केल्या त्याप्रमाणे नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरपण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळाला भेट देवून तांत्रिक विश्लेषण करुन नमूद गुन्हयातील आरोपी 1) अचरार अहमद मुक्तार शहा उर्फ अशपाक (46 वर्षे) 2) वसिम ऊर्फ साहील यासिन शहा 3) मोहम्मद तारीक ऊर्फ फैजल कादरी अब्दुल गफार सिदिदकी सर्व मिरारोड पुर्व मूळ उत्तरप्रदेश यांना निष्पन्न करुन आरोपींचा गुन्हयात सहभाग दिसून आल्याने आरोपीना गुन्हयात अटक करण्यात आली. अटक आरोपींकडून गुन्हयातील फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी 6 लाख 02 हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार भूषण पाटील, संतोष पाटील,सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पोलीस शिपाई ऑकार यादव, सुरजसिंग घुनावत,अस्वर, पोशि-पवार तसे कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे.