Mira Bhayandar Police News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून “रायझिंग डे” निमित्त पथनाट्य स्पर्धेचे आयोजन
Mira Bhayandar Police News : “सायबर क्राईम जनजागृती आणि ड्रग्स चे दुष्परिणाम” या विषयावर 15 शाळेने सादर केले पथनाट्य
मिरा रोड :- “रायझिंग डे” निमित्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ-3 विरार यांच्यातर्फे “सायबर क्राईम जनजागृती आणि ड्रग्स चे दुष्परिणाम”या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजक करण्यात आले होते. Mira Bhayandar Police Rising Day या कार्यक्रमाला परिमंडळ 3 हद्दीतील तब्बल 15 शाळेने सहभाग नोंदवला होता. पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये काशिनाथ पाटील विद्यानिकेतन यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 1) गुलजीभाई मेहता स्कूल 2) जॉन-२३ शाळा 3) एक्सपर्ट स्कूल 4) रॉयल ॲकेडमी 5) मॅट्रीक्स स्कुल 6) संत लिला स्कूल ॲण्ड ज्युनीयर कॉलेज 7) सेंट मेरी स्कुल 8) काशिबाई पाटील विद्या निकेतन 9) विद्या विहार शाळा 10) वि.वा. कॉलेज 11) जि.प. नेहरु हिंदी स्कुल 12) बापुजी बाचाजी जाधव विद्या मंदीर 13) रामकृष्ण हाजी स्कुल 14) ट्री हाऊस 15) सेंट जोसेफ कॉलेज, सत्पाळा या शात्य, महाविद्यालय यांनी भाग घेतला होता.काशिबाई पाटील विद्यानिकेतन (प्रथम क्रमांक),मूलजीभाई मेहता स्कूल (द्वितीय क्रमांक) मॅट्रीक्स स्कुल (तृतीय क्रमांक) हे या स्पर्धेत विजय झाले आहे.कार्यक्रमाकरीता 750 ते 800 विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र तेंडुलकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, बोळीज पोलीस ठाणे यांनी केलेले होते. स्पर्धेत पथनाट्य स्पर्धेचा दांडगा अनुभव असलेले जगदीश अनंत संसारे, प्राध्यापक सेंट जोसेफ कॉलेज सत्पाच्य यांनी परिक्षकाची भूमीका बजावली आहे.
पोलीस पथक
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पौर्णिमा श्रींगी (चौगुले), पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2,जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग व परिमंडळ-3 मधील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.