Milind Narvekar Property : विधान परिषदेचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची संपत्ती किती?
Milind Narvekar Property : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे सचिव उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या संपत्तीचा आकडा पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.!
मुंबई :- विधान परिषदेच्या 11 जागे करिता 12 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता काल (2 जुलै) रोजी उमेदवाराकडून अर्ज भरण्यात आला होता. या अर्जात सर्वात चर्चेत राहिले म्हणजे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांच्या संपत्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चाळीस वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. विधान परिषदेच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या संपत्तीची आकडेवारी पाहून आपल्याला ही आश्चर्य वाटेल की, नार्वेकर हे कोट्याधीश असून त्यांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे. स्वतःच्या आणि पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्याचे प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. तसेच त्यांच्याकडे सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या संपत्तीवरून पुन्हा एकदा नवीन राजकीय आरोप प्रत्यारोप होणार असल्याचे दिसून येत आहे. Milind Narvekar Property
विधान परिषदेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांचे PA मिलिंद नार्वेकर यांची संपत्ती ( Milind Narvekar Property )
- त्यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये, तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे.
- त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रक्कम आहे.
- मिलिंद नार्वेकर यांनी 50 हजार तर पत्नीने 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये
म्युच्युअल फंड व बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे. पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये त्यांचे 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीचे 67 लाख 88 हजार 558 रुपये आहेत. - नार्वेकरांकडे 355.94 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 24 लाख 67 हजार 981 रुपये आहे. चांदी 12.56 किलोग्रॅम असून त्याची किंमत 9 लाख 74 हजार 656 रुपये आहेत. हिऱ्यांची किंमत 36 लाख 85 हजार 552 रुपये आहे. एकूण दागिन्यांची किंमत 71 लाख 28 हजार आहे. त्यांच्या पत्नीकडे 425 ग्रॅम सोने किंमत 29 लाख 26 हजार 21 रुपये, चांदी – 6.26 किलो किंमत 4 लाख 85 हजार 776 रुपये तर 33 लाख 49 हजार 623 किमतीचे हिरे आहेत. त्यांच्या पत्नीकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत 67 लाख 61 हजार 420 रुपये आहे.
- मिलिंद नार्वेकर यांचे श्री बालाजी कॉम एलएलपी कंपनीत स्वतःचे 10 कोटी 11 लाख 28 हजार 152 तर, पत्नीची एकूण रक्कम 31 कोटी 25 लाख 33 हजार 560 रुपये आहेत.
- मिलिंद नार्वेकर यांचे ‘अदानी’ पोर्ट्स सहित अनेक कंपन्यामध्ये शेयर्स आहेत.
- मलिंद नार्वेकर कुटुंबाची कोकण आणि बीडमध्ये जमीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड (ता. दापोली) येथे 74.80 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये पत्नीचा 50 टक्के वाटा आहे. तसेच बंगळूर येथे पत्नीच्या नावावर जमीन व पत्नीच्याच नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस आहे.
- नार्वेकरांची स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम 4 कोटी 17 लाख 63, हजार 323, पत्नीच्या मालमत्तेची रक्कम 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 रुपये आहे.
- पण, पाली हिल इथं राहत असलेलं घर मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर अथवा बायकोच्याही नावावर नाही. नार्वेकरांकडे एकही वाहनही नाही.