Meenatai Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त ठाकरे कुटुंब शिवाजी पार्कमध्ये
•उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी असंख्य शिवसैनिकांसह मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन!
मुंबई :- स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुलगा उद्धव ठाकरे आणि सून रश्मी ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.
ममता दिन अर्थात स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मॉंसाहेबांच्या स्मारकावर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ह्यांनी मॉंसाहेबांना अभिवादन केले. ह्यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते माजी महापौर मिलिंद वैद्य, उपनेते गुरुनाथ खोत, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, विभागसंघटक माजी महापौर श्रध्दा जाधव तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.