मुंबईक्राईम न्यूज

Malad Fake Doctor News : बोगस डॉक्टर यांचा मालाड परिसरात बेकायदेशीर क्लीनीकचा पर्दाफाश

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-12 ; खुनाच्या गुन्हयात मुख्य आरोपी बोगस डॉक्टर त्यांची पत्नीसोबत मालवणी, मालाड परिसरात बेकायदेशीर क्लीनीक चालवत, दोन्ही बोगस डॉक्टरांवर यांच्यावर कारवाई.

मुंबई :- मालवणी परिसरात बोगस डॉक्टर म्हणुन अजिज पॉली क्लीनीक नावाने हॉस्पीटल चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-12 यांना मिळाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने कक्ष-12 मधील पोलीस पथकाने मुंबई महानगर पालीका, पी/नॉर्थ विभागाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांची मदत घेवुन नमुद घटनास्थळी छापा टाकला असता, इसम नावे परवेज अब्दुल अजिज शेख, (46 वर्षे), हा कोणताही वैदयकीय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडीकल काऊन्सील मध्ये नोंदणी नसताना, डॉक्टर असल्याचे भासवून, बेकायदेशीररीत्या विविध आजारांवरील रूग्णांना त्याचे रुग्णालयात दाखल करून घेवुन त्यांना इंजेक्शन्स व सलाईन देवून तसेच औषधोपचार करून रुग्णांची फसवणूक करत असताना मिळून आला असता, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे . यातील मुख्य पाहिजे आरोपी यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई येथे नोंद असलेला गुन्हा कलम 112,117,120 (ब), 302,307,416,419,465,426,471,34 भादवि सह कलम 33,33(अ), 34,36 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट 1961 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांची कारवाई

आरोपी याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय परवानगी नसल्याचे माहिती असुन सुद्धा त्यास त्याच्या पत्नीने तीचे अजिज पॉली क्लीनीक हा वैद्यकीय दवाखाना चालवण्यास दिला. तसेच नमुद महिला आरोपी हिच्याकडे बीयुएमएस (BUMS) ही पदवी असून, सदर पदवी प्रमाणे अधिकृत नसलेली औषधे दवाखान्यात ठेवण्याची परवानगी नसताना सुद्धा ती त्यांचे दवाखान्यात ठेवून त्यांचे पती परवेज शेख याच्या मार्फत ती रूग्णांना दिल्याचे आढळुन आल्याने सदर महिला आरोपी व तिचा पती यांना वेगवेगळ्या आजारा वरील औषधे, इंजेक्शन, सलाईन व इतर वस्तूंसह ताब्यात घेवुन त्यांच्या विरूद्ध मालवणी पोलीस ठाणेस कलम 419,420,34 भादवि सह कलम 33,33 (अ), 33(ब), 35(2), 36 महाराष्ट्र मेडिकल ट्रॅक्टीशनर्स ॲक्ट 1961 अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना पुढील कारवाई करिता मालवणी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी क्र. 01 याचा गुन्हे अभिलेख

1) कापुरबावडी पोलीस ठाणे कलम 420,386,34 भादवि

2) मालवणी पोलीस ठाणे कलम 420 भादवि

3) मालवणी पोलीस ठाणे कलम 419,420 भादवि सह कलम 33,34,35 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट 1961 आरोपी क्र. 01 व त्याची पत्नी (32 वर्षे) यांचा गुन्हे अभिलेख मालवणी पोलीस ठाणे येथे कलम 419,420 भादवि सह कलम 33,34,35 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट 1961

पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती Deven Bharti,पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी कुमार मिना Shashikumar Meena, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकुर, सहाय्यक पोलीस आयुक्त (ह-उत्तर), काशिनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-12 चे प्रभारी पोलीस निरीक्षक, नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, महिला पोलीस निरीक्षक निलोफर शेख, पोलीस हवालदार शैलेश बिचकर, विशाल गोमे,प्रसाद गोरूले, शैलेश सोनावणे, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ व सहाय्यक फौजदार कैलास सावंत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0