Mira Bhayandar Maharashtra Din : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र दिन साजरा
Mira Bhayandar Police Maharashtra Din Celebration : मिरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्तालयात ध्वजारोहण कार्यक्रम तसेच पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या 11 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस आयुक्त यांचे हस्ते अभिनंदन
मिरा रोड :- महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातही महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी महासंचालकाकडून जे 11 अधिकारी आणि अंमलदार यांना पदके जाहीर करण्यात आले आहे त्यांचा सत्कार केला असून त्यांचे अभिनंदनही केले. Mira Bhayandar Police
मिरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी पोलीस आयुक्त यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्तलयातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच नागरीक यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. Mira Bhayandar Police
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या 11 पोलीस अधिकारी अंमलदार यांचे गा.पोलीस आयुक्त यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. Mira Bhayandar Police
पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांची नावे
1) पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, गुन्हे शाखा युनिट-1
2) पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सायबर पेलीस ठाणे
3) महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, भरोसा सेल
4) पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस उपायुक्त, परि.2, वसई कार्यालय
5) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक . रामचंद्र पाटील नेम. अ.नै.मा. या. शाखा
6) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक ईशी, नेम.अ.पो.आ. कार्यालय, मि.भा.व.वि.
7) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय मांडोळे, नेम, पोलीस उपायुक्त, परि-१, मिरारोड कार्यालय
8 ) पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव, नेग, पोलीस उपायुक्त, परि 1, मिरारोड कार्यालय
9) पोलीस हवालदार आनंद मोरे, नेम. तुळींज पोलीस ताणे
10) पोलीस हवालदार मुकेश पवार, नेम-वालीय पोलीस ठाणे
11) पोलीस शिपाई नामदेव ईश्वलकर, नेम पोलीस मुख्यालय
कार्यक्रमासाठी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बायचे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, मा.पालीस उपायुक्त (परि.१) प्रकाश गायकवाड, पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरीक उपस्थित होते. Mira Bhayandar Police