ACB Trap On Mahavitaran Officers : राज्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने ठाणे जिल्ह्यात जोरदार कारवाई होत आहे. नुकतीच एक मोठी कारवाई ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एसीबीच्या पथकाने केल्यानं खळबळ उडाली आहे.
डोंबिवली :- गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Corruption Bureau कारवायाबाबत चर्चा आहे. एसीबीने बुधवारी डोंबिवलीत मोठी कारवाई करण्यात आली आहे.महावितरण कंपनीचा डोंबिवलीच्या शिळफाटा ग्रामीण सेक्शन विभागात असलेला Dombivli Mahavitaran Officer Bribe लाचखोर सहाय्यक इंजिनिअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.या कारवाईमुळे महावितरणातील अन्य लाचखोरांचे देखील धाबे दणाणले आहेत.सुरेश भीमराव लबडे (43 वर्ष) सहाय्यक अभियंता असे लाचखोर महावितरणच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी केली आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे. Anti Corruption Bureau Latest News
तक्रारदार यांना नवीन वीज मीटर लावण्यासाठी सहाय्यक अभियंता यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर लाचखोर अभियंता याने तक्रारदार यांना नवीन विजा मीटर जोडण्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडअंती एका मीटर साठी 650 रुपये निश्चित करण्यात आले. तसेच चार वीज मीटर चे 650 प्रमाणे 2,600 रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. तक्रारदार याने ठाणे एसीबी कार्यालयात लाचखोर सहाय्यक अभियंता सुरेश लबडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी करून सापळा रचून 2600 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. लबडे यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anti Corruption Bureau Latest News
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुनिल लोखंडे पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे,महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो रूपाली पोळ यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईनंतर महावितरण मधील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. Anti Corruption Bureau Latest News