क्राईम न्यूजमहाराष्ट्र

Anti Corruption Bureau News : लाचखोर महावितरणाच्या अधिकाऱ्यांना एसीबीचा करंट

Sambhaji Nagar Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; महावितरणाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर :- महावितरण कन्नड विभागाच्या, (Mahavitaran Kannada Department) दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून अटक करण्यात आली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीने (ACB Department ) ताब्यात घेतले असून एक प्रकारचा एसीबी करंटच दिला आहे. तक्रारदार यांच्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता आणि उपव्यवस्थापकीय अधिकारी, (कन्नड महावितरण कार्यालय) यांनी तक्रारदार यांच्याकडे साडेतीन लाख रुपयाची मागणी केली होती. Sambhaji Nagar Anti Corruption Bureau News

महावितरणाच्या कार्यालयात लाच स्वीकारताना अटक

धनाजी रघुनाथ रामुगडे (54 वर्ष), कार्यकारी अभियंता, प्रवीण कचरू दिवेकर उप व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कन्नड कार्यालय येथे कार्यान्वित होते. तक्रारदार यांनी केलेले कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी रामुगडे आणि दिवेकर यांनी तक्रारदार याच्याकडे साडेतीन लाखाची मागणी केली होती. यापूर्वी तक्रारदार यांनी दीड लाख रुपये दोन्ही महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. उर्वरित दोन लाख रुपयाची रक्कम ही तक्रारदार यांनी तडजोड करून एक लाख रुपये घेण्याचे निश्चित केले. या सर्व प्रकरणाबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजी नगरच्या एसीबी कार्यालयाला तक्रार दाखल केली होती. एसीबीने सापळा रचून आज (10 जुलै) रोजी एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना धनाजी रामुगडे आणि दिवेकर यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कन्नड विभाग कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. तसेच ही रक्कम कार्यकारी अभियंता कक्षात स्वीकारत असताना एसीबीने त्यांना रंगेहात अटक केली आहे. या दोघांनाही ताब्यात घेतली असून त्यांच्या विरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात (Kannad Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Sambhaji Nagar Anti Corruption Bureau News

एसीबी पथक

संदीप आटोळे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर,राजीव तळेकर पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी प्रकाशगड मुंबई यांच्या संचालक यांच्या समक्ष सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर अमोल धस यांनी सापळा पथक पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, आत्माराम पैठणकर, बाबुल यांनी सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0