Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, काल मध्यरात्री मुसळधार पाऊस विजेचा कडकडाट
मुंबई :- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, रायगड,पालघर, बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये काल मध्यरात्री विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला होता. Maharashtra Weather News हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवार आणि मंगळवार राज्यात काही भागात मुसळधार तर काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.
मुंबई शहरात सकाळपासूनच दमट वातावरण असून आजही पावसानेची शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस विजेच्या कडकडाटासह कोसळत होता.रविवारी (22 सप्टेंबर) रात्री मुसळधार पाऊस कोसळला. तसेच सोमवारी सकाळच्या सत्रात पावसाने रिमझिम सुरुवात केली; पण दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळला. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असे म्हटले होते. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे.