Maharashtra Politics : तीन-चार महिन्यांपूर्वी बलात्कारातील एका प्रकरणातील आरोपीला फाशी दिली… एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर राजकीय पडसाद
•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगितले, विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार, संजय राऊत, किरण माने यांच्याकडून टीका
मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रत्नागिरी येथे झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री हे भाषण करताना बदलापूर घटनेचे राजकारण केले जात आहे असे म्हटले आहे. तीन चार महिन्यांपूर्वी घटना घडली होती त्यावेळी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले गेले आणि दोन महिन्यातच या आरोपीला फाशीची शिक्षा देत झाली असा दाखला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरून आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार खासदार संजय राऊत, शिवसेना नेते किरण माने यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याची पोस्ट?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवतात, याचा पुरावा!
बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, अस भर सभेत धडधडीत खोट बोलतात?!
मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली?
शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी.हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त SIT ची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत.मुख्यमंत्री महोदय ,बलात्कार सारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय तरी घेऊन नका!
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते किरण माने यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तुम्ही पाहिलं असेल काल मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असं सांगत आहे की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. पण, आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे.
किरण माने नमकं काय म्हणाले?
किरण माने यांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, “चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली.” इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम ‘माणूस’ म्हणवुन घ्यायच्या लायकीचा नाही…”