मुंबई

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ ऐवजी ‘ठाकरे + ठाकरे’ युती?

•मनसे-शिवसेना युतीसाठी महाविकास आघाडीत तातडीचा निर्णय? काँग्रेसने घेतली सावध भूमिका

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोन ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संदर्भात हालचाली वेग घेत आहेत.

अलीकडेच मुंबईत एका व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या राज ठाकरेंना युतीचं आवाहन केलं. राज ठाकरे यांनी यावर थेट प्रतिसाद दिला नसला तरी, संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे या युतीच्या चर्चेला अधिक अधिक उधाण आलं आहे. राऊत म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र समीकरणं असतात, आणि जनतेचा दबाव हा उद्धव-राज एकत्र येण्याच्या बाजूने आहे.”

दुसरीकडे, काँग्रेसकडून यावर सावध पवित्रा घेतला गेला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितले की, “स्थानिक निवडणुकांबाबतचे निर्णय स्थानिक नेतृत्व घेते आणि अंतिम निर्णय हायकमांडच घेणार आहे. सध्या आम्ही स्वबळावर तयारी करत आहोत.”

संजय राऊत यांनीही स्पष्ट केलं की, “महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक स्वरूपाच्या आघाड्याच प्रभावी ठरतात.” त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेमध्ये आगामी निवडणुकीपूर्वी युती होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0