मुंबई

Maharashtra Politics : शिंदेंच्या शाखेचे भाजपाच्या मंत्री आणि आमदारांनी केले उद्घाटन

•खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्याकडून टीका

मुंबई :- घाटकोपरच्या पंतनगर मधील शाखा क्रमांक 131 उद्घाटन भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोड आहे यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांचेच भुवया उंचावल्या आहेत. वास्तविक या शाखा उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार होते. मात्र, त्यांचा दुसरीकडे दौरा ठरल्याने ऐनवेळी भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. Maharashtra Politics

घाटकोपर मधील पतंगनगर मध्ये शाखा क्रमांक 131 चे उद्घाटन होणार होते. या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दुसरीकडे दौरा ठरला. त्यामुळे भाजप मंत्र्यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. भाजपच्या मंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ होती. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. Maharashtra Politics

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

डुब्लिकेट शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन मंगल प्रभात लोढांकडून करून घेत आहेत. यातच सर्व आलं. मुंबई कोणाला विकत आहेत, मुंबई कशी विकत आहेत, शाखा कशा विकल्या जात आहेत, उद्योगपती व्यापारी आणि बिल्डर यांना जे बिल्डर यांच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचे उद्घाटन करून घेत आहे यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. Maharashtra Politics

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका

अरेरे! काय दिवस आले? घाटकोपरमध्ये मिंधे गटाच्या शाखेचे लोकार्पण भाजपा मंत्र्याच्या हस्ते करावे? अजून काय पुरावा हवा आहे की ही यांचा आता निव्वळ ‘कचरा’ झाला आहे! यांना स्वगटातील एक बरा माणूस सापडू नये उदघाटन करण्यासाठी? लवकरच या शाखेची पाटी बदलून तिथे कमळाचे ठिगळ लावावे लागणार आहे, हे नक्की! Maharashtra Politics

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0