Maharashtra Politics : भाजपाने विधानसभा निवडणुकी करिता मेगाप्लॅन “या”नेत्यांवर सोपवली निवडणुकीची धुरा
•केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे चार भाजपाचे निवडणुकीच्या काळातले प्रमुख चेहरे
मुंबई :- विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाने मेगाप्लॅन तयार केला असून राज्यातील भाजपच्या प्रमुख चार नेत्यांवर पक्षाने निवडणुकीच्या धुरा सोपविले आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश विधानसभा निवडणुकीपूर्वी या चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी पक्षाकडून सोपविण्यात आली आहे.
याच प्रमुख नेत्यांबरोबरच वीस नेत्यांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे प्रमुख पद देखील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तेच या समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत. त्यांच्यासोबत या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, प्रवीण दरेकर, अतुल सावे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश असेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे सभा घेणार आहे. सर्व विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मेळावे यांच्या संवाद संवादही साधणार आहे. लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने विधानसभेला कोणत्याही प्रकारे धोका पत्करू नये याकरिता हा मेगा प्लॅन भाजपा कडून आखण्यात आला आहे.