Maharashtra Politics : सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवारांच्या जवळच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय खळबळ..
BABAN SHINDE MEETS SHARD PAWAR : अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे असणाऱ्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची भेट घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसत आहे
सोलापूर :- महाराष्ट्रात कधीही निवडणुका Vidhan Sabha Election जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील राजकीय पटलावरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वच पक्षांचे विद्यमान आमदार तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.दरम्यान, सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माढाचे आमदार बबन BABAN SHINDE MEETS SHARD PAWAR शिंदे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत.विशेष म्हणजे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेही शरद पवारांच्या सभेला पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी बबन शिंदे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली होती. शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. Maharashtra Latest Political Updates
अजित पवार यांचे समर्थक माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेही शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत.शिंदे आणि विलास लांडे हे दोघेही अजित पवार यांच्या गटाचे नेते आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नाडे या चार नगरसेवकांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली. याआधी राजन पाटील यांनीही काल शरद पवार यांची भेट घेतली होती. Maharashtra Latest Political Updates
आष्टी-पाटोदामधून शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष राम खाडे हे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे तेही शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.तर अकोल्यात विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणारे अमित भांगरे आपल्या आईसोबत शरद पवारांना भेटायला आले आहेत. अकोला विधानसभेतून आमदार किरण लहमटे यांच्या विरोधात अमित भांगरे निवडणूक लढवणार आहेत. Maharashtra Latest Political Updates