Maharashtra News : मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत देवदर्शन!
Maharashtra Breaking News : देवेंद्र फडणवीस सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ
मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि माहिती यांना अद्भुत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स काल समाप्त झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे शपथ घेणार असून तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळपासूनच देवदर्शन केले आहे.
सागर बंगल्यावर काही वारकऱ्यांनी गोमातेला घेऊन आले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोमाताचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले. शिवसेना शिंदे माजी आमदार आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच, मुंबादेवीचे ही देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते.
फोटो गॅलरी