Panvel News : युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण साळुंखे
पनवेल : दैनिक भास्करचे रायगड जिल्हा प्रतिनिधी भूषण साळुंखे यांची युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे पत्रकार भूषण साळुंखे यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी रायगड आणि नवी मुंबईतील सर्वच उमेदवारांच्या गाठीभेटी घेवून आपल्या पत्रकारितेचा ठसा जोमाने उमटविला आहे, त्यांना जिल्ह्यातील पत्रकारांशी प्रदीर्घ अशा स्वरूपाचा परिचय आहे. पत्रकार भूषण साळुंखे यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, कृषी तसेच राजकारणी विषयावर नेहमी समाजोपयोगी बातम्या प्रकाशित केल्या आहेत. रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामिण भागातील पत्रकारांना युवा ग्रामिण पत्रकार संघटनेशी एकनिष्ठ जोडण्याची प्रतिक्रिया भूषण साळुंखे यांनी दिली.
भूषण साळुंखे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांना दिले आहे. तसेच नव्याने पनवेल तालुक्याच्या कमिटीची अधिकृत घोषणा ते लवकरच जाहीर करणार असून रायगड जिल्ह्याच्या कमिटीचीही ते बांधणी करण्यासाठी सरसावले असल्याची माहिती त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.