महाराष्ट्र

Maharashtra Navnirman Sena Anniversary : 18व्या वर्धापनदिनी,नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा

•राज ठाकरे यांनी चौफेर टीका, सत्ताधाऱ्यांसहित विरोधकांवर साधला निशाणा

नाशिक :- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. मनसेकडून वर्धापन दिन मुंबईबाहेर नाशिक मध्ये साजरा करण्यात आला आहे. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी आज मनसैनिकांना संबोधित केले आहे. यासाठी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसैनिकांनी जय्यत तयारी केली होती. Maharashtra Navnirman Sena Anniversary

राज ठाकरे यांनी भाषणात काय म्हणाले?
पक्षाला यश मिळवून देणार यावेळी राज ठाकरे म्हणाले, “18 वर्षात मी अनेक चढ उतार पाहिले. चढ कमी पहिले उतार जास्तच पाहिले. मात्र पक्षाला यश मिळवून देणार हा माझा शब्द आहे. मात्र त्यासाठी संयमाची गरज आहे. सध्या दुसऱ्याची पोरे कड्यावर घेऊन फिरण्याचा ट्रेंड आहे. पण मी स्वतःची पोरे कडेवर घेऊन फिरणार आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे” असे राज ठाकरे म्हणाले. Maharashtra Navnirman Sena Anniversary

प्रमुख जिल्ह्यांत वर्धापनदिन सोहळा साजरा करणार तसेच यावर्षी वर्धापनदिन सोहळा नाशिकमध्ये करायचे ठरवले. यापूर्वी पुणे, मुंबई ठाण्यात हा सोहळा झाला. आता दर वर्षी राज्यातील प्रत्येक प्रमुख जिल्ह्यांत वर्धापनदिन सोहळा साजरा करणार अशी घोषणाही राज ठाकरे यांनी केली. Maharashtra Navnirman Sena Anniversary

संयम अत्यंत महत्वाचा तसेच राष्ट्रवादीत घडलेली घटना म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची बांधणी मोडली. मात्र ते वेगळे झाले असले तरी निवडून येणार आहेत. खऱ्या अर्थाने पक्ष स्थापन झाला असेल तर तो जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर मनसे. मनसेत राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेक लोक आहेत. अनेक जण मोठ्या पदावर पोहोचतील. राजकारणात टिकून राहायचे असेल तर संयम अत्यंत महत्वाचा आहे”, असे राज ठाकरे म्हणाले. Maharashtra Navnirman Sena Anniversary

राज ठाकरे यांनी म्हणाले की कोणतेही आंदोलन आम्ही अर्धवट केले नाही तसेच जे जे आंदोलन केले ते आजपर्यंत यशस्वी झाले आहे. मी ज्यावेळी सरकार माझ्या हातात येईल त्यावेळी राज्यातले सर्व भोंगे बंद करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यामुळे या भाषणाच्या वेळी राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा पुन्हा काढला आहे. Maharashtra Navnirman Sena Anniversary

राज्यात फक्त बातमी होते. मात्र राष्ट्रवादीत सर्व एकत्रच आहेत. जनतेला येडा बनवून पेढा खाऊ घालत आहेत”, अशी टीका राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर केली आहे. “मनोज जरांगे यांनाही मी भेटायला गेलो तेव्हा सांगितले होते की तांत्रिक दृष्ट्या हे होणार नाही. ज्या गोष्टी होणार नाही ती आश्वासने सरकार देत आहे. त्यामुळे जनतेने या घोषणांना बळी पडू नये”, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे. Maharashtra Navnirman Sena Anniversary

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0