Maharashtra Lok Sabha Phase 4 Voting Update: राज्यात सांय.5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान
Maharashtra Lok Sabha Election Live Updates: राज्यात सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात 60.60 टक्के, तर सर्वात कमी शिरूर लोकसभा मतदारसंघात 43.89 टक्के मतदान झाले आहे
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 4) राज्यातील 11 मतदारसंघांत सोमवारी निवडणूक झाली. त्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान झाले. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदासंघातील अनेक मतदान केंद्रांवर अजूनही मतदारांची झुंबड आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी काही वेळ मतदान प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे.(Maharashtra Lok Sabha Phase 4 voting still 52 percentage)
मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – 60.60 टक्के
जळगाव – 51.98 टक्के
रावेर – 55.36 टक्के
जालना – 58.85 टक्के
औरंगाबाद – 54.02 टक्के
मावळ – 46.03 टक्के
पुणे – 44.90 टक्के
शिरूर – 43.89 टक्के
अहमदनगर- 53.27 टक्के
शिर्डी – 52.27 टक्के
बीड – 58.21 टक्के