महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 LIVE : मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून थेट मतदान केंद्रावर मतदान करायला पोहोचले

Manoj Jarange Patil On Lok Sabha Election : राज्यातील आठ जागेवर दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होणार असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मनोज जलांगे पाटील रुग्णालयातून थेट मतदान केंद्रवर

जालना :- रुग्णवाहिकेतून जालन्यात पोहोचून केले मतदान आज राज्यातील आठ जागांवर मतदान पार पडत आहे. मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांनीही आपला मतदानाचा Vote हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर Election Center त्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर Manoj Jarange Patil छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णवाहिकेतून जालन्यात पोहचून त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

सर्वांनी आमचं वाटोळं केले पण लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे असे विधान करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर देखील टीका केली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधकांना पाडा. निवडणूक रिंगणात आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे.

ते म्हणाले, “आपला उमेदवार निवडणुकीत नसल्यामुळे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांना मतदान करा. तसेच जे मराठा आरक्षणाच्या विरोधकात आहेत त्यांना इतक्या ताकदीने पाडा की त्यांच्या कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने मराठ्यांनी एकजूट दाखवावी”, असे जरांगे म्हणाले. Maharashtra Lok Sabha Election Update

8 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार याशिवाय ४ जूनपासून बाजी लावणार आहे. 6 जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास मी 8 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. ते म्हणाले, “सर्वांनी आमचे वाटोळे केले आहे. पण लोकाशाहीचा हक्क बजवायला पाहिजे. मी पुन्हा आंदोलन करणार आहे. माझे शरीर साथ देत नसले तरी मी मरणाला घाबरत नाही. समाजाने काळजी करू नये. मी खंबीर आहे. आशीर्वाद आणि साथ द्या”, असे जरांगे म्हणाले.

आरक्षण न दिल्यास मी 8 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. ते म्हणाले, “सर्वांनी आमचे वाटोळे केले आहे. पण लोकाशाहीचा हक्क बजवायला पाहिजे. मी पुन्हा आंदोलन करणार आहे. माझे शरीर साथ देत नसले तरी मी मरणाला घाबरत नाही. समाजाने काळजी करू नये. मी खंबीर आहे. आशीर्वाद आणि साथ द्या”, असे जरांगे म्हणाले.लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे. आपण मतदान केले पाहिजे. माझं मराठा आणि महाराष्ट्रातील लोकांना आवाहन आहे की, सर्वांनी १०० टक्के मतदान करा. लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदान केलं पाहिजे”, असे आवाहन जरांगे यांनी राज्यातील मतदारांना केले आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0