महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election Live Result : उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात हवा, छत्रपती शाहू महाराज आघाडीवर, संभाजी महाराजांनी मानले आभार

Maharashtra Lok Sabha Election Live Result Update : धाराशिव, नाशिक,कोल्हापूर, बारामती येथील उमेदवारांची वाटचाल विजयाकडे, महाविकास आघाडीला मोठे यश

लोकसभा निवडणूक लाईव्ह :- धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ओमराजे निंबाळकर Omraj Nimbalkar यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. या मतदारसंघातून निष्ठावंतांची लढाई म्हणून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाच्या वतीने प्रचार करण्यात आला. त्याचा फायदा त्यांना झालेला दिसतो आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्क्याने पुढे आहेत. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. Maharashtra Lok Sabha Election Live Result Update

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचेच राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

मतमोजणी दरम्यान महाविकास आघाडीचे Mahavikas Aghadi उमेदवार ओमराजे निंबाळकर Omraj Nimbalkar यांनी लाखांपेक्षा जास्त मतांनी मताधिक्य मिळवले आहे. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीच्या कलापासूनच ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातूनही महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनीही एक लाखांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे.

नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आघाडीवर

नाशिक लोकसभा Nashik Lok Sabha Election मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मागे पडले आहेत. तर याच मतदारसंघातून शांतिगिरी महाराज देखील तिसऱ्या नंबरवर आहेत. शिवसेनाच्या वतीने या मतदारसंघातून उमेदवार उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात भुजबळ नाराज असल्याचे चित्र देखील दिसून आले होते. भुजबळ यांनी सुरुवातीपासून हेमंत गोडसे यांच्या प्रचारात पुढाकार घेतला नव्हता. तर राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. त्याचा फायदा राजाभाऊ वाजे यांना झाला असल्याचे दिसून येत आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Result Update

नेमके काय म्हणाले युगेंद्र पवार

बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मतदारसंघातील पवार कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. सुप्रिया सुळे Supriya Sule यांचा प्रचार करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनताच पुढे आली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा युगेंद्र पवार यांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे हा जनतेचा विजय असल्याचे देखील युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Result Update

Web Title : Maharashtra Lok Sabha Election Live Result : Uddhav Thackeray wanted in Maharashtra, Chhatrapati Shahu Maharaj in the lead, Sambhaji Maharaj thanked

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0