Maharashtra Election Update : महाराष्ट्रात मतदानाला वेग, दुपारी 3 वाजेपर्यंत 43 टक्के मतदान, दोन तास बाकी
•लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अमरावती, अकोला, नांदेड अशा एकूण आठ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.
लोकसभेच्या आठ जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती मतदान झाले याची आकडेवारी समोर आली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 43.01 टक्के मतदान झाले. एकूण आठ जागांचे बोलायचे झाले तर वर्ध्यात 45.95 टक्के, अकोल्यात 42.69 टक्के, अमरावती 43.73 टक्के, बुलढाणा 41.66 टक्के, हिंगोली 40.50 टक्के, नांदेड 42.42 टक्के, परभणीत 44.49 टक्के आणि परभणीत 54.54 टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड व परभणी या 8 जागांचा समावेश आहे. येथील सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीचा उत्साह आहे. पण काही ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड झाल्यामुळे मतदानाचा खोळंबाही झाला आहे