Maharashtra Election 2024 Voting update : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये सरासरी 65.11 टक्के मतदान, गडचिरोली मध्ये सर्वात जास्त मतदान तर मुंबई शहरात सर्वात कमी मतदान
Maharashtra Election 2024 Voting Update : राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत काल (20 नोव्हेंबर) रोजी झालेले मतदानात राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात यंदा 2019 च्या तुलनेत पाच टक्क्याने मतदान वाढल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून काही ठिकाणी कमी प्रमाणात मतदार झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये साधारणतः संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले असून सर्वात कमी मुंबई शहरात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
अहमदनगर – ७१.७३ टक्के,
अकोला – ६४.९८ टक्के,
अमरावती – ६५.५७ टक्के,
औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
बीड – ६७.७९ टक्के,
भंडारा – ६९.४२ टक्के,
बुलढाणा – ७०.३२ टक्के,
चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
धुळे – ६४.७० टक्के,
गडचिरोली – ७३.६८ टक्के,
गोंदिया – ६९.५३ टक्के,
हिंगोली – ७१.१० टक्के,
जळगाव – ६४.४२ टक्के,
जालना – ७२.३० टक्के,
कोल्हापूर – ७६.२५ टक्के,
लातूर – ६६.९२ टक्के,
मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
नागपूर – ६०.४९ टक्के,
नांदेड – ६४.९२ टक्के,
नंदुरबार- ६९.१५ टक्के,
नाशिक – ६७.५७ टक्के,
उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,
पालघर – ६५.९५ टक्के,
परभणी – ७०.३८ टक्के,
पुणे – ६१.०५ टक्के,
रायगड – ६७.२३ टक्के,
रत्नागिरी – ६४.५५ टक्के,
सांगली – ७१.८९ टक्के,
सातारा – ७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,
सोलापूर – ६७.३६ टक्के,
ठाणे – ५६.०५ टक्के,
वर्धा – ६८.३० टक्के,
वाशिम – ६६.०१ टक्के,
यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.