Maharashtra CM Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला राज्यामधील विरोधातील महत्त्वाचे नेते मारणार दांडी
Maharashtra CM Oath Ceremony: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला पवार, ठाकरे उपस्थित राहणार?
मुंबई :- राज्यातील मुख्यमंत्री Maharashtra CM Oath Ceremony पदाकरिता देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळा शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी राज्यभरातील सर्वच प्रमुख नेत्यांना देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संपर्क करून निमंत्रण दिले होते. परंतु शरद पवार हे दिल्ली येथील हिवाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असल्याची बातमी समोर आली आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वैयक्तिक कारणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपले शपथविधी कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले असून नरेंद्र मोदी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. नरेंद्र मोदी सोबत केंद्रातील अनेक महत्त्वाचे नेते तसेच 400 साधुसंत या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर महायुतीचे सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.