Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, शिक्षक, शेतकरी आणि महिलांबाबत सरकार करू शकते मोठी घोषणा
Maharashtra Cabinet meeting Latest Update: आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत 19 प्रमुख निर्णयांना मंजुरी मिळू शकते. ही बैठक दुपारी 2 वाजता होणार आहे.
मुंबई :- आज मंत्रिमंडळाची Cabinet Meeting महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात 19 महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. (Important meeting of the state cabinet) काजू उत्पादक शेतकरी आणि शिक्षण सेवकांच्या पगारवाढीसारख्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.
आजच्या बैठकीत अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना 100% फी प्रतिपूर्ती दिली जाईल. गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी रंगाच्या ई-रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षण सेवकांच्या पगारवाढीचाही विचार केला जाणार आहे. याशिवाय काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे, नवीन पर्यटन धोरण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहेत.