मुंबई

Panvel News : पनवेलमध्ये गुटखा आणि अमली पदार्थांची विक्री जोरात; BJP कार्यालयाजवळील पान टपरीवर कारवाईचा प्रश्नचिन्ह

पनवेल : पनवेलमधील तक्का परिसरात सुनील बहिरा यांच्या BJP कार्यालयालगत असलेल्या एका पान टपरीवर गुटखा आणि अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पान टपरीवर बेकायदेशीररित्या गुटख्यासह अन्य नशायुक्त पदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे. यामुळे परिसरातील तरुणांवर वाईट परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, हे दुकान BJP कार्यालयाच्या अगदी जवळ असल्याने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.स्थानिकांनी याबाबत त्वरित कारवाईची मागणी केली असून, पोलिस आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “हा प्रकार गंभीर आहे. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर याचे दुष्परिणाम समाजावर होऊ शकतात,” असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर कोणती कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत या बेकायदेशीर धंद्याला आळा बसणार नसल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0