Manoj Jarange Patil Shantata Rally In Nashik : मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली नाशिक मध्ये असणार आहे. भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ
नाशिक :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मराठा नेते मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांची राज्यभरात शांतता रॅली सुरू आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट) ही रॅली शहरात येत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस या ठक्कर बसस्थानकातून सुटणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक किरण भोसले यांनी दिली आहे.नाशिक शहर पोलिसांकडून Nashik Police शहरातील घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यासोबतच कठोर कारवाईची समजही पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या गोपनीय शाखेकडून करडी नजर ठेवली जात आहे. त्याचबरोबर भुजबळ फार्म येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फार्मवर येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जात असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सागितलं.
जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करीत आहेत. त्यांचा हा संघर्ष राज्य शासनाविरुद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसात त्याचा फोकस भाजप देखील आहे. यामध्ये छगन भुजबळ यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीला फाटा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. Manoj Jarange Patil Shantata Rally In Nashik
आज मंत्री भुजबळ यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होत आहे. या रॅलीची जबरदस्त तयारी समर्थकांनी केली आहे. सबंध शहरात स्वागताचे फलक आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी शांतता रॅली काढली आहे. नगरमार्गे ही रॅली नाशिकमध्ये दाखल होत आहे. सकाळी 11 वाजता तपोवन येथून रॅलीला प्रारंभ होईल. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचेल. त्यानंतर सीबीएस चौकात जरांगे यांची जाहीर सभा होईल. यानिमित्ताने शहर-परिसर भगवेमय झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: रॅलीचा मार्ग व सभास्थळाची पाहणी केली. दरम्यान जरांगे वावी, सिन्नर, नाशिकरोडमार्गे शहरात दाखल होतील. त्यापुढे जेल रोड, नांदूरनाका, छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे तपोवन येथे आगमन होईल. सकाळी ११ वाजता तेथून शांतता रॅलीला सुरुवात होईल. तेथून नवीन आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजामार्गे मालेगाव स्टॅन्ड येथे रॅली पोहोचेल. तेथे जरांगे-पाटील यांचे स्वागत केले जाणार आहे. Manoj Jarange Patil Shantata Rally In Nashik