महाराष्ट्र

Maharashtra 3rd Phase Voting: महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान सुरू, सकाळी 11 वाजेपर्यंत किती मतदान?

Maharashtra 3rd Phase Voting Till 11 AM : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.

पुणे :- राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान झाले. लातूरमध्ये 20.74 टक्के ,सांगलीत 16.61 टक्के, बारामतीत 14.64 टक्के ,हातकणंगलेत 20.74 टक्के, कोल्हापुरात 23.77 टक्के, माढा मध्ये 15.11 टक्के,धाराशिवमध्ये 17.06 टक्के रायगडमध्ये, 17.18 टक्के रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये, 21.19 टक्के , साताऱ्यात 18.94 टक्के,सोलापुरात 15.69 टक्के मतदान झाले आहे. Maharashtra Lok Sabha Live Update

  • 11 वाजेपर्यंत सर्वात जास्त कोल्हापूर मतदारसंघात 23.77 टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी बारामतीत 14.64 टक्के झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण यांनी मोठा दावा केला आहे. राणे म्हणाले, “येथे रोजगार आणण्यासाठी मी काम करत आहे. येत्या 2 वर्षात आम्ही इथे अभियांत्रिकी आणि अन्न प्रक्रिया उद्योग आणू. महाराष्ट्रात 40-42 जागा जिंकू.”शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी मतदान केले. दरम्यान, ‘गद्दार कोण हे जनता ठरवेल, महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल,’ असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. Maharashtra Lok Sabha Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0