Maha Vikas Aghadi Meeting: महाविकास आघाडी जागावाटप : काँग्रेस 17 जागांवर तर शरद पवारांचा पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंना किती मिळाले?
•महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) अनेक बैठका होऊनही जागावाटपाचा मुद्दा रखडला होता. आता जागांबाबत अंतिम निर्णय झाला आहे.
मुंबई :- महाविकास आघाडी साठी आजचा दिवस मोठा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज पत्रकार परिषद बोलावली आहे. महाविकास आघाडी मधील जागा वाटपाबाबत आज महत्वाची माहिती देण्यात आली आहे. आता कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याची चर्चा सार्वत्रिक रंगली असताना आज झालेल्या पत्रकार परिषदेत जागेबाबत स्पष्टता आलेले आहे.
काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चुमुर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई.
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे
बारामती,शिरुर,सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, वर्धा, अहमदनगर, दक्षिण, बीड
उद्धव ठाकरेंची शिवसेना 21 जागांवर निवडणूक लढवणार आहे
जळगाव, परभणी,नाशिक, ठाणे,कल्याण,मावळ,धाराशिव, बुलढाणा,संभाजीनगर,शिर्डी,सांगली,हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई.