Maha Vikas Aghadi Andolan : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ,महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन
•शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तिन्ही पक्षांनी राज्यभरात सरकार विरोधात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन
मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाच्या शुक्रवारी (23 ऑगस्ट) महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्णय दिला होता. तसेच कोणताही राजकीय पक्ष अथवा व्यक्ती महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. या घडामोडीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद पाडण्याचा निर्णय मागे घेत काळेफिती, काळे झेंडे दाखवून बदलापूर घटनेचा निषेधार्थ आंदोलन केले.
बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यभरात आंदोलन केले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात आंदोलनात सहभागी होऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला तसेच सरकारवरही आरोप केले आहे.
फोटो गॅलरी