मुंबई
Trending

Madhukar Pichad : भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड तुतारी हाती घेणार का? भाजपाला शरद पवार गट पुन्हा एकदा धक्का देणार?

Madhukar Pichad And Vaibhav Pichad Meet Sharad Pawar : मधुकर पिचड आणि वैभव पिचड सिल्वर ओकवर, अर्धा तास खलबते

मुंबई :- अहमदनगर जिल्ह्या त भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड Madhukar Pichad आणि त्यांचा पुत्र वैभव पिचड Vaibhav Pichad पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पिचड पितापुत्र आणि पवार यांच्या अर्धा तास चर्चा झाली. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अनेक राजकीय नेते मंडळी इतर पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. आपापल्या मतदारसंघात असलेले सोयीचे राजकारण आणि तिकीट मिळण्याची शक्यता, यावरही पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सध्या पिचड कुटुंब हे भाजपमध्ये असले तरी ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0