क्राईम न्यूजमुंबई
Trending

Love Story Murder : प्रेम प्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या, तरुणीच्या शरीरावर वार

Uran Love Story Murder News : प्रियकराने 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केली, मृतदेह झुडपात टाकला

उरण :- नवी मुंबईतील Navi Mumbai अक्षता म्हात्रे Akshata Mahtre तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे घटना ताजी असताना पुन्हा एकदा उरण मध्ये एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. उरण येथील एन.आय.स्कूलजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. या स्कूलजवळ राहणारी 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या Murder करण्यात आली आहे. या प्रकरणी उरण शहरसहित तालुका हादरून गेला आहे. घटनेनंतर उरण पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपी हा मुस्लिम असून तो बंगलोर या ठिकाणी गेला असल्याचे तपासात समजले आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. Navi Mumbai Latest Crime News

उरण शहरातील एनआय स्कूलच्या जवळील घरात राहाणाऱ्या यशश्री शिंदे या 22 वर्षांच्या मुलीची कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. यशश्री शिंदे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती आज (27 जुलै) पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली. उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी तिचे हात, अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी नेण्यात आला. तसंच या घटनेबाबत अधिक तपास उरण पोलीस करत आहेत. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशश्री शिंदे ही 25 जुलैपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. Navi Mumbai Latest Crime News

तरुणीच्या हत्याबाबत सर्व उरण मधून निषेध व्यक्त

विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी,शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, गणेश नलावडे, शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा, तालुकाध्यक्ष सीमा घरत, भारतीय जनता पार्टीचे रवीशेठ भोईर, कौशिक शहा, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, जेएनपीएचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते संतोष घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच विविध शिवप्रेमी संघटना, संस्था, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.सदर आरोपीचा शोध सुरु असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. या निंदनीय कृत्याचे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटले असून सोशल मीडियावर नागरिकांनी मोठया प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे. तर उरण मधील व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.पोलीस या आरोपीला लवकरच लवकर ताब्यात घेणार असून नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. Navi Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0