Lok Sabha Election Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या त्या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांकडून कौतुक, महायुती बाबत चिंता
Babanrai Madne React On Mahayuti Decision : मुंबई प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग बबनराव मदने यांनी छगन भुजबळ यांच्या निर्णयाचे स्वागत तर केलेच परंतु महायुतीच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले.
मुंबई :- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी लोकसभेच्या Lok Sabha Election रिंगणातून माघार घेत असल्याचे कालच्या पत्रकार परिषदेत घोषित केले त्यांच्या या निर्णयाचे ओबीसी समाजाकडून स्वागत तर करण्यातच आले परंतु महायुतीच्या निर्णयाबाबत शंका उपस्थित केले आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar Group गटाचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. अजित पवार गटाकडूनही त्यांच्या नावाची घोषणा झाली असून फक्त औपचारिक घोषणा बाकी होते. परंतु या सर्व घडामोडींवर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या निर्णयाबाबत विलंब लागत असल्याने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचार पुढं गेल्याने आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर ओबीसी समाजाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष बबनराव मदने Babanrao Madne यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. Maharashtra Lok Sabha Election Update
बबनराव मदने काय म्हणाले?
लोकसभेच्या रिंगणातून छगन भुजबळ यांनी माघारीचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये घोषित केल्यानंतर बबनराव मदने यांनी पत्रकारांना सांगताना म्हणाले की, भुजबळांनी घेतलेला निर्णय आम्ही ओबीसी समाजाकडून स्वागत करतो परंतु नाशिकच्या विकासात खारीचा वाटा असलेल्या ओबीसी नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. महायुतीचे केंद्रीय नेतृत्व असलेले तसेच देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी छगन भुजबळांच्या उमेदवारी बाबत त्यांना सूचना दिल्या असतानाही महाराष्ट्र मध्ये महायुतीकडून विलंब का लागत होता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्णयाच्या आम्ही स्वागत करतोच आणि महायुतीचा धर्म आम्ही निभाऊंच आणि राज्यात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक लोकसभेच्या जागा निवडून असे भावना व्यक्त करत नाशिककरांसाठी आणि ओबीसी समाजासाठी मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने एक खंत व्यक्त केली आहे. Maharashtra Lok Sabha Election Update