Arvind Kejriwal : मी उद्या भाजप कार्यालयात येत आहे, जो कोणीही…’, विभव कुमारचा उल्लेख करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
Arvind Kejriwal On BJP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आम आदमी पार्टीच्या मागे पडल्याचेही ते म्हणाले.
ANI :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, भाजप जेल-जेलचा खेळ करत आहे. आधी त्यांनी मला तुरुंगात टाकलं, आज माझ्या पीएला तुरुंगात टाकलं. आम्ही दिल्लीत चांगले काम केले आहे, त्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकायचे आहे. जे काम ते करू शकत नाहीत ते आम्ही करत आहोत.अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी उद्या 12 वाजता भाजप कार्यालयात येत आहे, ज्याला तुरुंगात टाकायचे आहे, त्याला तुरुंगात टाका, हे लोक आम आदमी पार्टीच्या मागे लागले आहेत. आमचा काय दोष? आमच्या लोकांना तुरुंगात का टाकले जात आहे? Arvind Kejriwal Live Updates
स्वाती मालीवाल यांच्यासोबत कथित मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना शनिवारी (18 मे) अटक केली आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले. विभव कुमारने आपल्या वकिलामार्फत 30 हजार रुपयांच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला होता.