महाराष्ट्र

लासरा बॅरेजेस भुसंपादन, प्रशासन हालले, आमदारांनी दिले पत्र

कळंब (प्रतिनिधी) : दि.२३ लासरा बॅरेजेस अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवारी अर्धनग्न डुबकी मारो आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी तात्काळ थेट खरेदी समितीची बैठक धाराशिव येथे गुरूवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केली होती.
या बैठकीत सौदणा अंबा येथील थेट खरेदी तात्काळ करण्याचे आदेश दिले तर उर्वरित गावांचे भुसंपादनाचा निवाडा तात्काळ करण्याचे सांगितले. यावेळी कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील, निम्न तेरणा कालवा विभाग 2 येथील सहाय्यक अभियंता शिवनंदा स्वामी , सहाय्यक अभियंता भुरे उपस्थित होते.

तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले आमदारांनी पत्र

लासरा बॅरेजेसचे भुसंपादन त्वरित करण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांत संबंधित अधिकाऱ्यांच्या तीन बैठका घेतल्या असून आपणास ही प्रत्यक्ष भेटून सुचविले होते तरी 26 अॉगसट च्या आत कार्यवाह करावी असे पत्रात आमदार कैलास घाडगे पाटील नमूद केले आहे.

शेतकरी आंदोलनावर ठाम

बैठक संपल्यानंतर उपविभागीय अधिकारी संजय पाटील व निम्न तेरणा कालवा विभाग 2 च्या अभियंता स्वामी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली यावेळी शेतकरयानी अगोदर कार्यवाही पुर्ण करा त्याशिवाय माघार नाही असे सांगितले. यावेळी परमेश्वर पालकर, संदीप पालकर, सुनिल आवाड,उत्रेश्वर आवाड, वसंत काळदाते, नवनाथ मदने,कचरु शेळके, राम शेळके, धनेश्वर पालकर, अण्णासाहेब पालकर, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0