Rahul Gandhi Tweet On Shivjayanti : राहुल गांधी यांनी शिवजयंती निमित्त केलेल्या ट्विट मुळे विरोधकांकडून टिकेची जोड

•राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो ;एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत ; काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हषवर्धन सपकाळ
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी अभिवादनाच्या ऐवजी श्रद्धांजली शब्द वापरल्याने महायुतीकडून टीकास्त्र करण्यात आली आहे. यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हषवर्धन सपकाळ यांची सारवासारव करत आहेत. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत, असे ते म्हणाले. तर पंतप्रधान मोदींनी देखील जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली होती, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्यामुळे भाजपने राहुल गांधींवर टीका करणे हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
‘ध’ चा ‘मा’ करुन घाणेरडे राजकारण करू नये ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांना अभिवादन न करता विरोधकांनी राहुल गांधींच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी राजकारण सुरु केले आहे. हा खेळ काही विरोधकांचा नवा नाही, पंडित जवारलाल नेहरू यांच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचे काम करण्यात आले होते. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्यांच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ‘ध’ चा ‘मा’ करुन घाणेरडे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.
काय म्हणाल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका ट्विटचा दाखला देत भाजपवर निशाना साधला आहे. सुषमा अंधारे भाजपवर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, शिवराय या आराध्यांच्या संबंधाने आम्ही संवेदनशील आहोत. पण राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजपच्या भक्तूल्यांनी भगतसिंह कोश्यारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही? किंवा राहुल सोलापूरकरवर कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते? याची आधी उत्तर द्यावी.
राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते वारंवार अपमान करत आले आहेत. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आहे. हे तमाम शिवभक्तांचा अपमान आहे. हे चुकून झालेले नाही. हे त्यांची जीभ घसरलेली नाही, तर हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर त्यांनी माफी मागायला पाहिजे.
राहुल गांधींचे काय ट्विट आहे?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत विनम्र ‘श्रद्धांजली’ अर्पण केल्याने वादाला तोंड फुटले आहे. श्रद्धांजली या शब्दामुळे राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच हे मुद्दाम केलेले विधान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा देखील अनेकवेळा अपमान करताना दिसतात. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली असल्याची टीका शिंदे यांनी केली.