पुणे

Kondhwa police : रमजान निमित्त कोंढवा पोलीसांकडून बैठक, वाहतूक सह फूड स्टॉलबाबत निर्णय

kondhwa police

पुणे, दि. 8 मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)

इस्लाम धर्मातील महत्वाचा रमजान (रोजे) महिना सुरू होत असल्याने मस्जिद परिसरात रोजे सोडण्यासाठी गर्दी होते. फूड स्टॉल मुळे रस्त्यावरील गर्दी वाढते व वाहतूक समस्या निर्माण होते, याचाच अंदाज घेत कोंढवा पोलीस kondhwa police वपोनि संतोष सोनवणे यांनी बैठकीचे आयोजन करत समस्या सोडविण्यासाठी व्यापक उपाय योजना आखल्या आहेत.

काल दि. 7 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे झालेल्या सर्वधर्मिय बैठकीत वाहतूक समस्या तसेच इतर अडचणी यांच्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीस अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप – आयुक्त आर राज, इंगळे सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग उपस्थित होते. बैठकीत वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सदर बैठकीत अल्पसंख्यांक समिती पुणे शहर अध्यक्ष समीर अन्सार शेख, शांतता कमिटी सदस्य अबिद सय्यद, महाराष्ट्र ॲक्शन कमिटी अध्यक्ष जाहीद भाई शेख , माजी नगर सेवक गफुर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ), हाजी फिरोज शेख, श्रीमती हसीना इनामदार , मौलाना कारि इद्रिस, मौलाना अन्वर सुफी साहेब, माजी आमदार महादेव बाबर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), व ईतर १२० ते १२५ मस्जिद मदरसा ट्रस्टी ,सदस्य तसेच पुणे महानगर पालिका पाणी पुरवठा विभाग अधिकारी, एम एस सी बी कार्यालय अधिकारी व कर्मचारी, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी कोंडा वाहतूक विभागाकडील अधिकारी असे हजर होते.

यावेळी वाहतूक विषयी होणाऱ्या अडचणींवर खालील उपयोजना करण्यात आल्या आहेत.

१) रमजान ईद निमित्त उभारण्यात येणारे खाद्यपदार्थ स्टॉल हे मनपा कडील , वाहतूक विभागाकडील, तसेच संबंधित इतर विभागांकडे परवानगी घेऊन उभारण्यात यावे.

२)वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने कोणतेही स्टॉल उभारण्यात येऊ नये.

३)स्टॉल उभारल्यानंतर सदर स्टॉलचे पार्किंग हे आवश्यक आहे सदर बाबत कोंढवा दक्षता घेण्यात यावी असे सूचना देण्यात आल्या.

४) नमाज चे वेळी पार्किंग व्यवस्था योग्यरीत्या करण्यात यावी तसेच सदर वेळे मस्जिद कमिटीकडील स्वयंसेवक नेमण्यात यावेत.

५) आक्षेपार्ह धार्मिक तेढ निर्माण होईल असे बॅनर लावू नयेत तसेच संवेदनशिल प्रकार आढळून आल्यास तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशन अथवा डायल 112 वर कळवावे व कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासनास मदत करावी असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0