
India VS SA Test : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पण 71 धावांतच 3 विकेट गमावल्या; कर्णधार टेम्बा बावुमा फेल
India vs South Africa 1st Test :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोलकाता येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी, सुरुवातीलाच आफ्रिकेला मोठे धक्के दिले असून, त्यांची फलंदाजी डळमळीत झाली आहे. India VS SA Latest Test Match Update
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेने 71 धावांच्या आतच आपले तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराहने 57 धावांवर रायन रिकल्टनला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात 31 धावा केलेल्या एडन मार्करमला शिकार बनवत आफ्रिकेला मोठा झटका दिला. त्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादवने कर्णधार टेम्बा बावुमाला (3 धावा) तंबूत पाठवले.
बुमराहने अवघ्या दोन षटकांत दोन महत्त्वाचे बळी घेऊन भारताला सामन्यात मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवले आहे. या सामन्यात भारताचे कर्णधारपद शुभमन गिल सांभाळत आहेत, तर प्लेइंग ११ मध्ये यशस्वी जायसवाल, केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात एडन मार्करम, रायन रिकल्टन, वियान मुल्डर, टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, ट्रिस्टान स्टब्स, काइल वेरिन (विकेटकीपर), साइमन हार्मर, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज यांचा समावेश आहे.



